June 30, 2025 6:46 am

अमळनेर येथे पोषण महीना अभियान कार्यक्रम संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर येथे पोषण महीना अभियान कार्यक्रम संपन्न
एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी जळगाव प्रकल्पांतर्गत अमळनेर नागरी विभागात फरशी रोडवरील आंबेडकर भवनातील अंगणवाडी केंद्रात पोषण अभियान कार्यक्रम बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पर्यवेक्षिका श्रीमती विजया सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पालेभाज्या,कडधान्यांसह विविध सकस आणि पुरक पोषण आहाराच्या केलेल्या पाककृतींचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
पोषण आहाराबाबत दरवर्षी सप्टेंबर महिन्यात जनजागृती केली जाते आणि सकस आहाराचे महत्त्व 0 वर्षे ते 6 वर्षातील बालकांना, गरोदर माता,स्तनदा माता,किशोरी वयीन मुलींना सांगितले जाते.हे अभियान संपूर्ण देशभरात कुपोषण मुक्त करण्यासाठी राबविले जाते.
सदर अभियान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुचिता पाटील,कल्पना येवले,उषा पाटील,सरला चव्हाण, कल्पना पाटील,ज्योती पिंगळे, वंदना पाटील,सुनिता नेतकर, मनिषा चौधरी,अलका चौधरी, प्रतिभा पाटील, ज्योती पाटील यांच्यासह अन्य अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी परिश्रम घेतले.

अंगणवाडी केंद्र ९१च्या सेविका सौ.उषा पाटील यांनी तयार केलेल्या पाककृतींचे निरिक्षण करतांना बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी, पर्यवेक्षिका विजया सोनवणे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!