पोळा आणि गणपती उत्सव शांततेत साजरा करा “पोलिस उपनिरीक्षक कुटूंबरे यांचे सुरंगली येथे शांतता कमेटीच्या बैठकीत आवाहन”
भोकरदन तालुका प्रतीनिधी डॉ.संजीव पाटील
भोकरदन:-तालुक्यातील सुरंगली येथे ग्रा.प.कार्यालयात बुधवारी 24 ऑगस्ट रोजी शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली.पोळा आणि गणपती उत्सव शांततेत साजरे करा असे आवाहन भोकरदन पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कुटूंबरे यांनी केले.गणेश मंडळांनी परवानगी घेऊनच गणपतीची स्थापना करावी.पोळा आणि गणपती उत्सव साजरे करतांना सर्वांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी फौजदार कुटुंबरे यांनी केले.भोकरदन उपविभागीय पोलीस अधिकारी बहुरे,पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात शांतता कमेटी बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब काळे, युवा कार्यकर्ते राहुल पाटील जाधव,योगेश बुलगे, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार शेख समदभाई,माजी सरपंच तथा पत्रकार डॉ.संजीव पाटील, पत्रकार सुभाष वर्पे,सतीश जाधव,सुरेश पाटील जाधव,मिलींद गवळी,दिपक गवळी,कृष्णा गवळी, सुरेश लोखंडे,संदीप दांडगे, अरुण तेजराव गवळी,जमादार डि.एन.राऊत साहेब आदी यावेळी उपस्थित होते.