June 30, 2025 2:58 am

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी

अपनी भाषा में पढ़े! Translate

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी

दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज चौथी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त देशभर त्यांना विविध कार्यक्रमाद्वारे आदरांजली वाहण्यात येत आहे. अटलबिहारी वाजपेयी हे उत्तम वक्ते, विचारवंत आणि आपल्या भाषणांद्वारे लाखो नागरिकांना प्रभावित करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते .

भारताची आर्थिक प्रगती आणि जागतिक स्तरावर भारताचं महत्व वाढण्याचं महत्वपूर्ण कार्य वाजपेयी यांच्या दूरदर्शी नेत्तृत्वात झालं अशा शब्दात केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी त्यांना ट्वीटर संदेशाद्वारे आदरांजली वाहिली आहे .

वाजपेयी यांच्या नवी दिल्लीतील सदैव अटल या समाधीस्थळी आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!