सनराईज पब्लिक स्कूल;शेळवे च्या विद्यार्थ्यांचे पंढरपूर टॅलेंट सर्च परिक्षेत नेत्रदीपक यश..!!
पंढरपूर प्रतिनिधी गणेश ननवरे
साप्ताहिक दिपज्योति व दै.पंढरी भूषण वृत्त समूहाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पंढरपूर टॅलेंट सर्च परीक्षेत सनराईज पब्लिक स्कूल; शेळवे च्या विध्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले.सदर परीक्षेचा बक्षिस वितरण समारंभ पंढरपूर येथील शिक्षक सोसायटीच्या इमारती मध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांचे सुपुत्र दिग्विजय पाटील, निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक अरुण पवार ,श्री.भागवत साहेब,आदर्श शिक्षिका सौ. लेंगरे मॅडम,परिचारक क्लासेस चे मंदार परिचारक सर,उद्योजक उद्धव बागल, व पंढरी भूषण व साप्ताहिक दिपज्योति चे सर्वेसर्वा शिवाजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले. ई.२ री ते ५वी च्या तब्बल १७ विध्यार्थ्यांनी केंद्रात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून नैपुण्य प्राप्त केले, ई २ री मधून पृथ्वीराज बालाजी गाजरे व कु.संस्कृती समाधान गाजरे हिने प्रथम क्रमांक,कोडग आरोही विश्वास व समिक्षा नागटीळक हिने द्वितीय तर कु.पोरे सिद्धी उमेश हिने तृतीय क्रमांक पटकावला,
ई ३ री मधून कु.बनसोडे वैष्णवी शिवप्रसाद व श्रावणी अमर पाटील प्रथम,पवार ओंकार विजय द्वितीय तर पवार संचिता बाबासाहेब हिने तृतीय क्रमांक पटकावला;
ई ४ थी मधून यलमर प्राची मारुती प्रथम क्रमांक, यलमर पंचम नितीन द्वितीय क्रमांक तर आसबे तनया तानाजी व मोकाशी ओम धनाजी यांनी तृतीय क्रमांक पटकावला;
ई ५ वी मधून कु.साळुंखे अमित गजानन प्रथम,गायकवाड ओम विष्णू द्वितीय क्रमांक तर कु. नागटीळक वैष्णवी संतोष हिने तृतीय क्रमांक मिळवून यश प्राप्त केले सदर विध्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस टी गाजरे, संस्थापक सचिव अंकुश गाजरे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे, सहशिक्षक मोहन गायकवाड, सौ.उषा लामकाने,सौ.मनीषा गोरे, सौ.दिपाली कुंभार,सौ. प्रियंका गाजरे, कु.अन्नू शेख व सर्व मार्गदर्शक स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले, संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या, जे विध्यार्थी सहभागी झाले त्यांनाही पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा व प्रेरणा देण्यात आली..!!
यशस्वी विद्यार्थ्यांवर शेळवे पंचक्रोशीतुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.