शिरपूर: प्रियदर्शनी मुकबधिर विद्यालय शिरपुर येथे 75 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे अंतर्गत ध्वजारोहणासाठी ऑल इंडिया लीनेस क्लब चे अध्यक्ष डॉ. नलिनी राठी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. सौ. संगिता देवरे मॅडम (माजी नगराध्यक्ष), शिखा राठी मॅडम, नेहा अग्रवाल मॅडम, डॉ. रुपाली अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. अमृतमहोत्सव निमित्त प्रियदर्शनी मूकबधिर विद्यालयात विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना बिस्कीट व खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला. तसेच देशमुख सरांनी मुकबधिर विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषेत अमृत महोत्सव विषयी माहिती देण्यात आली. तसेच ऑल इंडिया लीनेस क्लब चे अध्यक्ष डॉ. नलिनी राठी मॅडम, सौ. संगिता देवरे मॅडम (माजी नगराध्यक्ष), शिखा राठी मॅडम, नेहा अग्रवाल मॅडम व डॉ. रुपाली अग्रवाल यांचा सर्वांचा परिचय करून देण्यात आला. मुकबधिर विद्यार्थी यांच्या चेहरा वरच हास्य बघून क्लब च्या अध्यक्ष व सभासद यांनी समाधान व्यक्त केले व आभार प्रदर्शन देशमुख सरांनी केले .