चैतन्याज् ॲकडमी व चैतन्याज् इंटरनॅशनल स्कुल व ज्युनिअर कॉलेज मध्ये ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.
चैतन्याज् ॲकडमी व चैतन्याज् इंटरनॅशनल स्कुल व ज्युनिअर कॉलेज मध्ये ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावर्षी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन असल्याने भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन स्कुलतर्फे केले होते, त्यामध्ये देशभक्ती पर गिते, नाटक,भाषण अशा प्रकारचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले,
तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले,
कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी सरपंच सौ.मनिषा आटोळे होत्या, त्यावेळी त्या म्हणाल्या की देशासाठी बलिदान दिलेल्या शुर जवानांच्या आठवणींचा हा आजचा दिवस आहे आज ते सिमेवर आपले संरक्षण करतात म्हणुनच आपण स्वातंञ्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत,
प्रमुख पाहुणे पदी उपसरपंच श्री.फक्कड बालगुडे होते त्यांनी स्कुलचे खुप कौतुक केले हिथुनपुढेही अश्याच कार्यक्रमाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती रुजवावी अशी आशा व्यक्त केली.
यावेळी सरपंच, उपसरपंच, संस्थेचे चेअरमन, खजिनदार ,व इतर मॅनेजमेंट प्रतिनिधी, पालक ,विद्यार्थी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.