भिगवन मध्ये रोटरी क्लबच्या रोटरी सखी तर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा….
(निलेश गायकवाड )
काल झालेल्या स्वातंत्र्य दिन च्या अमृत महोत्सव आणि निमित्त भिगवन रोटरी क्लब मधील रोटरी सखी यांच्यातर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला… यावेळी बोलताना रोटरी क्लब भिगवन च्या सेक्रेटरी सौ वैशाली बोगावत म्हणाल्या की, आपल्याला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण झाले आहेत याचा आनंद सर्वांनी उत्साहात साजरा केला पाहिजे,देशाच्या स्वातंत्र्यासाठी, प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात विरांना विनम्र अभिवादन !
रोटरी क्लबच्या फर्स्ट लेडी डॉ. शिवराणी खानावरे म्हणाल्या की,आपण सर्वजण स्वातंत्र्य उपभोगत आहोत, त्यामागे पिढ्यानपिढ्यांचे बलिदान, संघर्ष आणि तपश्चर्या आहे. राष्ट्रोदयासाठी शतकानुशतके गाळलेल्या घामाची, अश्रूंची आणि सांडलेल्या रक्ताची जाणीव भावी पिढ्यांच्या मनात जागी राहिली पाहिजे.
यासाठी सर्व रोटरी सखींनी मिळून एक छोटा कार्यक्रम आयोजित केला होता… या यामध्ये सौ.रत्नमाला रायसोनी, सौ. ललिता वाकसे, सौ. स्मिता बोगावत, सौ. आशा चौधरी, डॉ स्मिता खानावरे, सौ.दिपा भोंगळे, सौ. शुभांगी रायसोनी सखी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन सौ.नीलिमा बोगावत, सौ.तहमिन शेख, सौ.आशा चौधरी यांनी केले तर आभार सौ. निशिगंधा कुदळे यांनी मानले….

