करमाळा प्रतिनिधी – दिनांक 30 -31 जुलै 2022 रोजी झालेल्या अरिस्टो किड्स अंतर्गत ऑनलाइन आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत एकूण 23 देशासह 1950 विद्यार्थ्यांचा विविध लेव्हल्स मधून या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला होता . या स्पर्धेत विद्यार्थ्यांना सात मिनिटात 100 गणिते अचूक सोडवणे अनिवार्य होते . कै साधना बाई नामदेवराव जगताप मुलींचीशाळा नंबर१ ची इ. 3 री व सौ .ज्योती मुथा यांच्याअबॅकस अकॅडमी ची विद्यार्थिनी कुमारी समीक्षा महेश थोरे हिने सहा मिनिट 21 सेकंदामध्ये शंभर गणिते अचूक सोडवून सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे व तिला अरिस्टो किड्स कडून ट्रॉफी व स्मार्ट वॉच देण्यात येणार 1आहे .शाळेचे मुख्याध्यापक श्री. दयानंद चौधरी यांनीही तिचे कौतुक केले आहे व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .