July 1, 2025 8:07 am

भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी जयसिंग राजपूत यांची नियुक्ती

अपनी भाषा में पढ़े! Translate

भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी जयसिंग राजपूत यांची नियुक्ती

शिरपूर प्रतिनिधी: तालुका भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी जातोडा येथील माजी सरपंच जयसिंग रतनसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली. माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या हस्ते जयसिंग राजपूत यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती प्रतिनिधी योगेश पाटील यांच्यासह शिरपूर भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आकाश मराठे आदिंची उपस्थिती होती.

जयसिंग राजपूत यांच्या नियुक्ती बद्दल तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, शिरपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, जि प अध्यक्ष डॉ तुषारभाऊ रंधे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, उद्योगपती चिंतनभाई पटेल, मा नगरसेवक अशोक कलाल, शिरपूर भाजपा ज्येष्ठ नेते दिलीप लोहार, शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, साखर कारखाना संचालक भरत पाटील, मा जि प सदस्य उदेसिंग राजपूत जातोडा, मा पं स उपसभापती जगतसिंग राजपूत, पं स सदस्य निंबा पाटील, जातोडा मा सरपंच उदेसिंग भटेसिंग राजपूत, शिरपूर तालुका सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया बोरगांव, भाजपा तालुका सरचिटणीस जितेंद्र सूर्यवंशी व परिसरातील ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!