June 30, 2025 2:24 pm

मदनवाडी येथे अंगणवाडी सेविका मदतनीस आशाताई आरोग्य सेविका यांनी केले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्तनपान सप्ताह आयोजित

अपनी भाषा में पढ़े! Translate

मदनवाडी येथे अंगणवाडी सेविका मदतनीस आशाताई आरोग्य सेविका यांनी केले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्तनपान सप्ताह आयोजित

(निलेश गायकवाड )

भिगवण :स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा व स्तनपान सप्ताह या कार्यक्रमाचे आयोजन बंडगरवस्ती अंगणवाडी येथे सर्व मदनवाडी अंगणवाडी सेविका मदतनीस आशाताई आरोग्य सेविका यांनी केले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बीट शेटफळगडे पर्यवेक्षिका सौ संजना शिंदे मदनवाडी सरपंच ताई प्राथमिक शिक्षिका वाघ मॅडम उपस्थित होत्या, तसेच या कार्यक्रमांमध्ये स्तनदा माता गरोदर माता व सर्व महिलांचा समावेश होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या राष्ट्रीय सणाविषयी माहिती पर्यवेक्षिका सौ संजना शिंदे यांनी दिली तसेच स्तनपान सप्ताह निमित्त गरोदर मातांना बाळंतपणानंतर एका तासाच्या आत नवजात बालकास स्तनपान करण्याचा सल्ला देऊन त्याचे महत्त्व तक्रारवाडी आरोग्य सेविका भोसले प्रियांका मॅडम यांनी दिली तसेच या कार्यक्रमांमध्ये पोषण आहाराविषयी गावांमध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या पालेभाज्या फळभाज्या कडधान्यांचे आपल्या आहारातील महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमांमध्ये संगीता कुंभार, संगीता मारकड, लतिका बंडगर, मंगल बंडगर, बेबी देवकाते, सुनीता उंडे आशा स्वयंसेविका सीमा मारकड या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!