मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत असणारे आमदार आजही शिवसेनेतच- दिपक केसरकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे आमदार आजही शिवसेनेतच असल्याचं पुनर्प्रतिपादन शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
भाजपासोबत युती करण्याची प्रक्रिया आधीपासूनच सुरु होती. अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची बदनामी झाली, त्यामुळे सारेच व्यथित झाले होते. त्यानंतर नारायण राणे यांना भाजपानं केंद्रीयमंत्रीपद दिल्यानं, तसंच भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनामुळे भाजपाबरोबर युतीची चर्चा थांबली. आता तीच प्रक्रिया पूर्णत्त्वाला नेल्याबद्दल आमच्यावर होणारी टीका योग्य नाही, असं केसरकर म्हणाले.