डिकसळ येथे मळीचा टँकर पलटी झाल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी झाल्या दूषित;नागरिकांचे आरोग्य धोक्यात
(निलेश गायकवाड )
इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथे करमाळाहुन ते फलटण येथे घेऊन जाणाऱ्या टँकर ने काल रोजी 03 ऑगस्ट संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पलटी झाल्याने टँकर मधील मळी परिसरात पसरली व शेजारी असणाऱ्या सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींमध्ये मुरले त्यामुळे या विहिरीतील पाणीही प्रदूषित झाले असून, आरोग्यास अपायकारक बनले आहे.परिणामी या विहिरींच्या पाण्यालाही दुर्गंधी येऊ लागली आहे. दुसरीकडे हे पाणी परिसरातील जनावरे आणि पक्षी पितात. त्यामुळे त्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे.सदर घटनेत पाणी दूषित झाले असल्याने माहित असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून पाणी सोडण्यात आल्याने नागरिक व जाणवरांचा जीव धोक्यात आला.
यासंबंधी ग्रामपंचायतीचे सरपंच सूर्यकांत सवणे, इंदापूर तालुका उपाध्यक्ष सुनील काळे यांनी झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित कंपनीला भेट देऊन नाल्यातील सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येऊन प्रयोगशाळेचा पुढील अहवाल आल्यानंतर कंपनीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच गावातील सर्व नागरिकांनी काळजी घेऊन सदरील सांडपाणी वापरू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच डिकसळ ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता योग्य कारवाई करून पाणी पुरवठा बंद करून झालेले दूषित पाणी उपसा करून स्वच्छ पाणी लवकरात लवकर देण्यात आल्याचे सांगितले.
