जळगाव शहर महानगरपालिकाच्या जन्म-मृत्यू कार्यालयाचा भोंगळ कारभार
आज दिनांक:-4-08-2022रोजी जन्म. मृत्यू.
कार्यालय महानगरपालिका येथे आप आदमी पार्टी चे महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर व अल्पसंख्यांक अध्यक्ष रईस भाई कुरेशी हे काही कारणास्तव जन्ममृत्यू नोंद महानगरपालिका कार्यात गेलेे असता जन्ममृत्यू नोंदद रजिस्टर अत्यंत दयनीय अवस्थेत पानांचे अक्षरशःह तुकडे तुकडेेले इतक्या जीर्ण भग्न परिस्थिती आढळून आली. या सादर्भात अधिकाऱ्यांसी बोलले असता वरिष्ठ अधिकारी लक्ष घालत नाही यामुळे लॅमिनेशन कॉटिंग बाईंडिंग होत नाहीये. शेवटी आम्ही काय करू शकतो असे संबंधित उपस्थित कर्मचारी व अधिकारी यांनी सांगितले.
याचं वेळी एक प्रकरण निदर्शनात आले
स्वर्गवासी शोभाबाई धनगर या दिनांक 31- 3- 2019 रोजी निधन पावल्या त्या दिवशी शिवाजीनगर स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी पार पडला त्याची रित सर नोंद मनपा कर्मचारी यांच्या कडे केली गेली. मृत्यू नोंद पावती क्र. 894 अशी केली गेली
मात्र दि 3/08/2022 रोजी मायाताचा मुलगा गणेश धनगर हे जन्म दाखला घेण्या करिता कार्यालयात आले असता. 894 पवती क्रमांक वर दुसऱ्याच मृत इस्माचे नाव असल्याचे आढळून आले. यावेळी कर्मचारी व अधिकारी यांनी सदर व्यक्तीस उडवा उडवीचे उत्तर देत त्या व्यक्तीला कोर्टाचा रस्ता दाखवला.
यावर कायदा असा आहे
कलम 15 नुसार जन्म मृत्यू नोंद वहीत चुक दुरुस्ती करता येते. सोपा मार्ग न वापरता नागरिकांना येथील अधिकारी फिरवाफिरवी करतात हे निदर्शनात आले.
मृत्यू नोंद पावती असतांना देखील कर्मचारी अधिकारी स्वतःची चुक मान्य करित नाही. तर उडवा उडवी चे उत्तर जळगावकरांना त्रास देतात.
या करिता आप चे महागर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर यांनी पुढाकार घेऊन मा.श्रीमती विद्या गायकवाड आयुक्त मॅडम यांना तक्रार केली आहे सदर तक्रारीत त्रस्त धनगर हे कोर्टात न जाता यांना त्यांच्या आईचे मृत्यू दाखला देण्यात यावा व नोंद रजिस्टर लॅमिनेशन करून सुरक्षित करावे अशी मागणी आपल्या निवेदनात केली आहे.
यावेळी उपस्थित कार्यकर्ते
योगेश भोई,रत्नाकर खरोटे, अरिफ खान,दुर्गेश निंबाळकर, व इतर उपस्थित होते.