इंदापुरात भाजपाच्या वतीने नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू…
भाजपच्या प्रभारीपदी मारुती अण्णा वणवे तर सहप्रभारी गोरख शिंदे यांची निवड…
इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे
इंदापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभारी पदी मारुती वनवे यांची तर सहप्रभारी पदी माजी नगरसेवक गोरख शिंदे यांची नियुक्ती केली.
भाजप पक्षाने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केली असून, नगरपालिकेच्या या रणधुमाळीत तयारीत बाजी मारल्याचे दिसून येत आहे, एकीकडे जरी तयारी सुरू असल्यास चित्र आहे. तर दुसरीकडे स्वतः माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कालच इंदापूर शहरात हजेरी लावलेली होती, त्यामुळे भाजप आता पूर्ण तयारी असल्यास दिसून येत आहे.
आगामी इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक प्रभारी पदी भिगवन येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती वनवे यांची तर सहप्रभारी पदी माजी नगरसेवक गोरख शिंदे यांची नियुक्ती केल्याने भारतीय जनता पार्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे.
या निवडीवेळी माजी नगरसेवक शेखर पाटील, पिंटू काळे, रघुनाथ राऊत, अविनाश कोथमिरे, प्रशांत गलांडे, सागर गानबोटे, नितीन मखरे, दत्तू पांढरे, महादेव पांढरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
