June 30, 2025 11:39 pm

शिरपूरात चौधरी समाजा तर्फे बबनराव चौधरी यांचा निवडीबद्दल सत्कार

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूरात चौधरी समाजा तर्फे बबनराव चौधरी यांचा निवडीबद्दल सत्कार

 शिरपूर : येथील भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांची प्रांतिक तैलिक महासभा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली. तसेच शिरपूर तेली पंच मंडळाचे खजिनदार संतोष चौधरी यांची व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्षपदी म्हणुन नुकतीच निवड झाली आहे. प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष खा. रामदास तडस यांनी प्रदेश उपाध्यक्षपदी बबनराव चौधरी यांची नियुक्ती केली आहे. त्याबद्दल बबनराव चौधरी व संतोष चौधरी यांच्या सत्कार शिरपूर तेली पंच मंडळाच्या वतीने तेली समाज भुवन शिरपूर येथे करण्यात आला. तसेच यावेळी खासदार रामदास तडस यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनच्या ठराव करण्यात आला. कार्यक्रमात पंच मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देतांना बबनराव चौधरी म्हणाले की, समाज संघटन व समाज कार्यात आपण पुर्ण क्षमते लक्ष देवु व माझ्यावर समाजाचे नेत्यांनी टाकलेला विश्वासास तडा जावु देणार नसल्याचे सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!