कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने 1111 वृक्ष लागवड व संगोपणाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या वाढदिवसानिमत्त संपन्न
(निलेश गायकवाड)
मा.ना.श्री.अजित पवार मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, विद्यमान विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त
महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यमंत्री तथा
इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय विकासरत्न मा.श्री.दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांच्या वतीने सोमवार दि २५-७-२०२२ रोजी श्री बिरोबा मंदिर भरणेवाडी* तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरणेवाडी येथे वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे या म्हणीप्रमाणे११११ वृक्ष लागवड व संगोपनाचा भव्य विधायक कार्यक्रम संपन्न झाला.

मा अनिकेत भरणे अध्यक्ष कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान,
श्री.दिपक भरणे सरपंच भरणेवाडी, श्री.भागवत भाऊसाहेब ग्रामविकास अधिकारी भरणेवाडी,श्री.देवराज आबा धातूंडे,श्री.महावीर देवडे मुख्याध्यापक जि.प.शाळा भरणेवाडी,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.नाना बोराटे, यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी श्री.लहू भूजबळ ग्रामपंचायत सदस्य, श्री.तानाजी खराडे ग्रामपंचायत सदस्य, श्री भाऊसाहेब भरणे, श्री राहुल भरणे यांच्यासह भरणेवाडी,अंथुर्ण गावातील ग्रामस्थ, तरूणवर्ग,कै भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अनिकेत भरणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते मा. उपमुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड केलेल्या ११११ वृक्षांचे संगोपन प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जाईल तसेच यापुढील काळातही वृक्ष लागवड व संगोपनाची चळवळ चालूच राहील.