June 30, 2025 4:48 pm

कर्जतच्या खाकी वर्दीने घडविले माणुसकीचे दर्शन!

अपनी भाषा में पढ़े! Translate

कर्जतच्या खाकी वर्दीने घडविले माणुसकीचे दर्शन!

बेवारस इसमाला आधार मिळवून देत माणुसकीचा धागा केला घट्ट
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत दि.२०

‘कडक शिस्त, भारदस्त आवाज, रागीट स्वभाव अन् खाकीचा धाक’ अशी पोलिसांची ओळख सर्वश्रुत असते, मात्र या खाकीत लपलेल्या प्रेमळ माणुसकीचे जेंव्हा वेगळ्या रूपाने दर्शन घडते तेंव्हा ही ‘खाकी वर्दी’ आपल्या मनात ‘आदराची गर्दी’ करून जाते. कर्जत पोलिसांबाबतचे तर अनेकवेळा असे प्रसंग पहायला मिळाले. एका अनोळखी, बेवारस इसमाला मिळवून दिलेल्या आधारामुळे नागरिकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण झाले आहे.


कर्जतच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात एका इसमाला १०८ रुग्णवाहिकेने उपचारासाठी नुकतेच दाखल करण्यात आले होते.हा इसम अनोळखी व बेवारस असल्याने त्यास कोणीही नातेवाईक नव्हते त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत कर्जत पोलिसांशी संपर्क साधून इसमाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. डॉ श्री महारुद्र खरपडे डॉ श्री सचिन डफळ आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही परिस्थिती हाताळत असताना या इसमाच्या खाण्याची-राहण्याची व्यवस्था कशी होणार? नुसत्या वैद्यकीय उपचाराने प्रश्न सुटणार नाही हा विचार केला. डॉक्टर आणि पोलीस यांच्यात वर्दीतला माणुसही प्रेम, जिव्हाळा,आपुलकीने भरलेला असतो जणू हा संदेश देत त्यांनी या इसमाच्या व्यवस्थेसाठी वेगवेगळ्या संस्थांशी संपर्क साधला. अनेकांना कॉल करून संवाद साधला मात्र यश आले नाही. त्यानंतर अहमदनगरच्या ‘मानव सेवा केंद्रास’ संपर्क साधून बेवारस इसमास पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ तसेच शाहूराज तिकटे ईश्वर माने शकील बेग सलीम शेख आदींनी दाखल केले.

    

संस्थेचे सर्वेसर्वा अंबादास गुंजाळ यांच्या मदतीने मानवसेवा पुनर्वसन केंद्रात बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्णांना अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य सुविधा मोफत पुरविल्या जातात.या केंद्रात आजवर २५०४ मनोरुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. ज्यांना कुणी स्विकारत नाही त्यांचा कायम सांभाळ ही संस्था करते.हालअपेष्टाचे,भूकमारीचे जीवन जगून आयुष्य संपवण्यापेक्षा या बेवारस इसमाची उपजीविका भागणार असून त्याचे राहणीमान सुरळीत होणार आहे. खाकी वर्दीने घट्ट केलेला हा माणुसकीचा धागा निश्चितच प्रत्येकाला ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ हाच धर्म शिकवतो.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!