जळगाव जिल्ह्यात स्वराज्य पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर,जिल्हा अध्यक्ष पदी सतीश गायकवाड तर अमळनेर तालुका अध्यक्ष पदी दीपक प्रजापती यांची निवड
मुक्ताईनगर : स्वराज्य पत्रकार संघठना ही पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी,पत्रकारांच्या हक्कासाठी लढणारी एक नावलौकिक संघटना आहे.आज मुक्ताईनगर येथील शासकीय विश्राम गृह येथे स्वराज्य पत्रकार संघटनेची बैठक संपन्न झाली. बैठकीत श्री सतीश गायकवाड यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी,प्रकाश चौधरी जिल्हा कार्यध्यक्ष, हेमकांत गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष,गजानन बेलदार बोदवड तालुका अध्यक्ष,दीपक प्रजापती अमळनेर तालुका अध्यक्ष,राजेंद्र चौधरी चोपडा तालुका अध्यक्ष,महेश गायकवाड यांची अडावद शहर अध्यक्ष, सौं धनश्री गायकवाड भुसावळ तालुका अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली सदर निवड ही स्वराज्य पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अंकुश भाऊ राठोड,राष्ट्रीय सचिव उद्धव भाऊ फंगाळ,मेहकर टाइम्स उपसंपादक विशाल भाऊ फितवे,यांच्या हस्ते करण्यात आली.
या बैठकीला लाभलेले प्रमुख मान्यवर राज्य पत्रकार संघाचे राष्ट्रीय सचिव, दैनिक मेहकर टाइम्स दैनिक विश्व जगत व दैनिक मेहकर टाईम्स लाईव्हचे वृत्तसंपादक तसेच महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलन समितीचे नवनियुक्त बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख श्री उध्दव फंगाळ, अंकुश राठोड राष्ट्रीय उपाध्यक्ष स्वराज्य संघटना दोन्ही पेपर व युट्युब चे कार्यकारी संपादक, विशाल फितवे उपसंपादक मेहकर टाइम, किसन लाटे मेहकर टाईम्स लाईव्हचे बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ,गजानन सरकटे स्वराज्य पत्रकार संघाचे मेहकर तालुका अध्यक्ष व बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी सौ किरण वाघ देऊळगाव रजा तालुका प्रतिनिधी,
सौं.सुमित्रा धांडे दारूबंदी अध्यक्ष मेहकर तालुका हे सर्व वरिष्ठ मान्यवर आणि जळगाव खान्देशचे सर्व दै. मेहकर टाइम्स व दै विश्व्जगतचे प्रतिनिधी उपस्थित होते.