रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या वतीने महिला सबलीकरणना सोबत मुलींच्या सक्षमीकरणाचा कार्यक्रम परिसरातील शाळेत संपन्न झाला ;
(निलेश गायकवाड )
रोटरी डिस्टिक 3131 अंतर्गत व GTPL यांच्या सी एस आर फंडातून रोटरी क्लब बिबेवाडी व
रोटरी क्लब भिगवण च्या वतीने अस्मिता प्रोजेक्टच्या अंतर्गत भिगवण येथे विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल कोंडीराम क्षीरसागर विद्यालय व दत्तकाला कॉलेज ऑफ फार्मसी येथे विद्यार्थिनींसाठी सक्षमीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात व महिला सक्षमीकरना विषयी जनजागृती करण्यात आली आले. व महिलांनी कशाप्रकारे सक्षम व्हावं यासाठी त्यांना संरक्षणासाठी व महिलां व मुलींच्या च्या अनेक समस्यांसाठी त्यांना भेटवस्तू म्हणून सॅमसंग टॅब च्या माध्यमातून मुलींच्या साठी ‘आस्मिता’ हा प्रकल्प हाती घेतला आहे मुलींनी वयात येताना काळजी कशी घ्यावी याबद्दल व संरक्षणाबद्दल व आहार कसा असावा त्याची माहिती उपलब्ध असनारे व्हिडिओ असणारे सॅमसंग टॅब 8 व तसेच महिलां मुलीनंसाठी 11000 सॅनिटरी नॅपकिन, व गुजराती मराठी भाषेतील माहिती बुक असणारे ह्यांड बूक तसेच मल्टी विटामिन टॅबलेट त्याच प्रमाणे महिला मुलींच्या संरक्षणासाठी ब्रँडेड बॉडीगार्ड स्प्रे अशा अनेक वस्तू त्या ठिकाणी मुलींना देण्यात आल्या व मुलींनी या वाढत्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आपला स्वतःचा बचाव कसा करायचा व त्याच्या विरोधात कसं लढायचं त्यासंदर्भात रोटरीचे अध्यक्ष संजय खाडे यांनी मार्गदर्शन केले, तसेच मुलींना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपला आहार कसा असावा आपल्या शरीराची कशी काळजी घ्यावी, व आपण या समाजात कसे वावरावे या बद्दल रोटरी सेक्रेटरी सुषमा वाघ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुलीं बहुसंख्येने उपस्थित होत्या. यावेळी अनेक मान्यवरांना सन्मानीत करण्यात आले. तसेच कोंडीराम सदाशिव शिरसागर विद्यालय भिगवण व दत्तकला शिक्षण संस्था स्वामी चींचोली व विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल, अशा अनेक शिक्षण संस्थांच्या विद्यालयाच्या ठिकाणी असे अनेक उपक्रम रोटरी क्लब भिगवण यांच्या वतीने राबवण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थितांमध्ये रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, व माजी अध्यक्ष संपत बंडगर, रियाज शेख, संजय चौधरी , पत्रकार प्रो.तुषार क्षीरसागर , रणजित भोंगळे, औदुंबर हुलगे, पत्रकार सुंदर कुसाळकर, निलेश गायकवाड, संस्थेच्या वतीने. अजय थोरात, विजय थोरात, विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापिका संगीता थोरात व विठ्ठलराव थोरात स्कूलच्या मुख्यद्यापीका वंदना थोरात , रोटरी क्लब च्या सेक्रेटरी सुषमा वाघ, रेखा खाडे, मीनाताई बंडगर, शुभांगी रायसोनी, वैशाली बोगावत , जगदाळे मॅडम, वाघ मॅडम, वाबळे मॅडम, शेख मॅडम, व शारदा वाघ अशा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.