June 30, 2025 11:08 pm

माजी मंत्री राम शिंदे यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल भिगवण येथे सत्कार संपन्न:बारामती लोकसभा मतदार संघात राजकीय चर्चेला उधाण

अपनी भाषा में पढ़े! Translate

माजी मंत्री राम शिंदे यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल भिगवण येथे सत्कार संपन्न:बारामती लोकसभा मतदार संघात राजकीय चर्चेला उधाण

(निलेश गायकवाड )

माजी मंत्री व भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून ओळख असणारे व विद्दमान विधानपरिषद मध्ये नुकतीच सदस्य पदी निवड झालेले व बारामती लोकसभा प्रभारी पदी पण निवड झाल्याबदल प्रा. राम शिंदे यांची बारामती लोकसभा मतदार संघात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण येथे इंदापूर तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस देवकाते यांच्या वतीने नगरी सत्कार घेण्यात आला.

राजकीय वर्तुळात भारतीय जनता पार्टीच्या वतीने होत असलेल्या हालचाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असलेला बालेकिल्ला बारामती लोकसभा मतदार संघात राम शिंदे यांच्या सत्कार म्हणजे येणाऱ्या काळात होणाऱ्या राजकीय घडामोडी डोळे उंचावणारे असतील. बारामती लोकसभा मतदार संघात धनगर समज्याचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. कर्जत जामखेड मध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रोहित पवार यांनी तयारी करत विधानसभा मिळवली होती. बरोबर त्याच दृष्टीने येणाऱ्या काळात देखील बारामती लोकसभा मतदार संघात असे काही चित्र दिसतील ते नवल वाटू नये असे म्हणावे लागेल.

यावेळी सत्कार प्रसंगी माऊली चवरे,पराग जाधव, संपत बंडगर,मारुती वनवे, संजय देहाडे,महेंद्र रेडके,दिनेश मारणे, राजेंद्र जमदाडे, माऊली मारकड तसेच मदनवाडी, तक्रारवाडी, भिगवण येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!