July 1, 2025 1:43 am

मिस इंदापूर २०२२ ह्या किताबाची मानकरी भूमिका पाडूळे..

अपनी भाषा में पढ़े! Translate

मिस इंदापूर २०२२ ह्या किताबाची मानकरी भूमिका पाडूळे..

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

इंदापूरात गुरुकृपा मंगल कार्यालय येथे प्रथमच मिस इंदापूर २०२२ स्पर्धा (TM modeling classes)
यांचे सहकाऱ्यांनी ग्रामीण भागात मॉडेलिंग बद्दल माहिती व्हावी व ग्रामीण भागातील तरुणींच्या कलेला वाव मिळवा,ह्या उद्देश्याने इंदापूर मध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती.समीक्षा बहुउद्देशिय विकास संस्थेच्या वतीने सर्व मॉडेलचा मेकअप करण्यात आला.प्रत्येक वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात येईल अशी माहिती आयोजकांनी दिली.इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मिस इंदापूर २०२२ या कीताबाची विजेती मानकरी भूमिका पाडूळे ही ठरली. या कार्यक्रमाचे आयोजन गितेश माळशिकारे व तेजश्री माळशिकारे यांनी या शो चे आयोजन केले होते. यावेळी भरत शहा,धनंजय (बाप्पू) वाशिबेकर मोमेरिअल फौंडेशन व अतुल शेटे,अनिल पवार,राहुल गुंडेकर यांनी सहकार्य केले असून आपल्या इंदापूरची मॉडेलिंग विश्वात मोठी ओळख निर्माण व्हावी असे बोलून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

  

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!