इंदापुरात वटपौर्णिमाचा सण मोठ्या उत्साहात साजरा…
इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे
अवचित सोडून गेलेल्या सत्यवान या पतीला वाचवण्यासाठी धर्मपत्नी सावित्रीने केलेल्या प्रार्थनेची परंपरा चालवण्यासाठी आज इंदापूर शहर व परिसरातील शेकडो सावित्रीनी जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत वडाच्या झाडाला दोऱ्याने साकडे घालून प्रार्थना केल्या. पारंपारिक आभूषणे आणि भरजरी भारतीय वेशभूषा लेऊन आज शेकडो महिला वडाच्या शेजारी जमल्या होत्या.
जन्मोजन्मी हाच पती मिळावा,असे साकडे घालत शहरातील सुवासिनी सावित्री’ नी आज वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त शहरातील विविध ठिकाणच्या मोठ्या वटवृक्षाची हळदी- कुंकवाने पूजा करून दोऱ्याने प्रदिक्षणा घालून सुवासिनींनी आपल्या मनातील मनोरथ पूर्ण केले.

दरम्यान सकाळी आठ वाजल्यापासून महिलांची शहरातील ठिकठिकाणच्या वडाच्या झाडाखाली गर्दी झाली होती.सकाळी घराघरातील महिला हातात वाणाचे ताट घेऊन बाहेर पडत होत्या. वटपौर्णिमेनिमित्त महिलांकडून एकमेकींना वाणासोबत शुभेच्छाही दिल्या जात होत्या. शहरातील भल्यामोठ्या डेरेदार वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिला वर्गाची झुंबड उडाली होती.