June 30, 2025 1:58 pm

११.१९ कोटींच्या करचोरी प्रकरणी एकास अटक महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई

अपनी भाषा में पढ़े! Translate

११.१९ कोटींच्या करचोरी प्रकरणी एकास अटक महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई
प्रतिनिधी-अर्जुन आहेर

मुंबई, दि. 14 : 50.88 कोटींची खरेदी दाखवून 11.19 कोटी रुपयांची चुकीची कर वजावट दाखवून शासनाचा महसूल बुडविल्याप्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कार्यवाही करुन मे. जातवेदास कंस्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. कंपनीचे संचालक हितेश अमृतलाल पटेल, (42), घाटकोपर यांना मंगळवार दि. 14 रोजी अटक केली. अन्य दोन संचालक अशोक मेवाणी व नरेंद्र पटेल यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महानगर दंडाधिकारी यांनी हितेश पटेल यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईत अन्वेषण – अ, मुंबईचे राज्यकर सहआयुक्त राहुल द्विवेदी, राज्यकर उपायुक्त राजेंद्र टिळेकर, संजय सावंत, सहायक राज्यकर आयुक्त संजय शेटे, नामदेव मानकर सहभागी झाले होते.

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत करचोरीप्रकरणी 19 जणांना अटक केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!