June 30, 2025 7:34 am

सावधान :वटसावित्री पौर्णिमेचे अनुषंगाने भिगवन पोलीस व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे महिलांना आव्हान

अपनी भाषा में पढ़े! Translate

सावधान :वटसावित्री पौर्णिमेचे अनुषंगाने भिगवन पोलीस व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे महिलांना आव्हान

(निलेश गायकवाड )

भिगवण पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्रात राहणाऱ्या सर्व नागरिकांना विशेषत: महिलांना भिगवण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार अवाहन करण्यात येते की,

आज दिनांक 14 जून रोजी अतिशय महत्त्व असलेला सण तो म्हणजे “वटसावित्री पौर्णिमा” या दिवशी सर्व स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो याकरता महिला वर्ग त्यांच्याकडे असलेले सोन्याचे दागिने परिधान करून त्यांच्या आसपासच्या परिसरात असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जात असतात.तसेच पोलीस स्टेशन पासून लांब असलेले ग्रामीण भागात जात असतात.

त्यावेळी काही संधिसाधू सोनसाखळी चोर मोटरसायकलवरून व पायी येऊन महिलांनी परिधान केलेले सोन्याचे दागिने खेचून चोरी करून पळून जाण्यासाठी संधी शोधत असतात.

सोन्याच्या दागिन्यांचे भाव अगदी गगनाला भिडलेली असून महिलांनी ते दागिने मेहनतीने त्यांनी बचत केलेल्या पैशातून बनवलेले असल्याने यात त्यांची खूप मोठी वित्तहानी होते.

तरी भिगवण पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व महिला, नागरिकांना भिगवण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व सर्व पोलीस टीम यांनी विनंती केली आहे की, आपण वडाच्या झाडाला पूजा करण्यासाठी जाताना परिधान केलेल्या दागिन्यांची काळजी घ्यावी तसेच सदर दागिने रस्त्याने जाताना चैन चोरास चोरता येणार नाहीत या पद्धतीने ते परिधान करावेत. तसेच रस्त्याने जाताना आपल्या मागून व आपल्या समोरून कोणी संशयित मोटर सायकलस्वार येतो किंवा कसे याबाबत लक्ष ठेवावे. तसेच रस्त्याने जाताना ग्रुप ने जावे. जास्त वेळ बाहेर राहू नये. संध्याकाळी झोपताना सतर्क राहावे.जेणेकरून कोणतीही सोनसाखळी चोरीची घटना आपले पोलीस स्टेशनच्या हद्दीत होणार नाही.

! सतर्क राहा सावध राहा !

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!