June 30, 2025 4:52 pm

तक्रारवाडी येथे शिवराज्याभिषेक सोहळा ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

तक्रारवाडी येथे शिवराज्याभिषेक सोहळा ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात साजरा

(निलेश गायकवाड )

तक्रारवाडी ग्रामपंचायत समोरील छत्रपती शिवाजी चौकात शिवराज्याभिषेक सोहळा ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम तक्रारवाडी गावचे प्रथम नागरिक सरपंच सतीश वाघ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वराज्याचे प्रतीक असलेल्या भगवा जरीपटका असलेल्या गुढीचा उभारणी करण्यात आली.

एकच धून सहा जून असणारा देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत ग्रामस्थांकडून महाराजांना त्रिवार अभिवादन करण्यात आले.त्याचबरोबर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या सोहळ्याला ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ,ग्रामपंचायत सदस्य अविनाश धुमाळ, शरद वाघ,मनीषा वाघ,राणी काळंगे, मंदाकिनी मोरे,संगीता वाघ, याच बरोबर विजय जगताप,संजय मोरे,विलास वाघ,सुरज वाघ,ग्रामसेवक बोरावके, तलाठी भारती भाऊसाहेब, तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेश नाचण,अंबादास देवकाते भारत गायकवाड, विकास मुळे, सचिन आढाव,रामभाऊ काळंगे,नंदू मोरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!