भिगवण मध्ये वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
(निलेश गायकवाड )
भिगवण परिसरात मंगळवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पाऊस पडला.विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे येथील शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची तसेच मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
भिगवण येथे गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मंगळवारी 31 मे रात्री ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे कडवळ मका यासारखी पिके जमीनदोस्त झाली तर काही व्यापाऱ्यांचे उघड्यावर पडलेल्या मालाचे नुकसान देखील झाले . काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या उन्हाळी कांदा काढण्याची व आडीला लावण्याचे काम चालू असतानाच पाऊस आल्याने कांद्यावर प्लास्टिकचा कागद झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली रात्रभर वीज गायब झाल्याने नागरिक मनस्ताप सहन करावा लागला.
