इंदापुरात वीर शिवा काशिद यांची जयंती उत्साहात साजरी…
इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जिवाभावाच्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्याचे तोरण बांधले. त्यातील एक असलेले शूरवीर मावळे शिवबा काशीद जयंती महोत्सव इंदापुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महारष्ट्र नाभिक महामंडळ इंदापूरच्या वतीने सोमवार (दि.३०) मे रोजी जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता.या जयंतीनिमित्त इंदापूर शहरातून शूर वीर शिवा काशिद यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर शिवव्याख्याते निलेश जगताप यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष रमेश राऊत,इंदापूर तालुका अध्यक्ष अवधूत पवार,शहराध्यक्ष संतोष क्षिरसागर,सचिन देवकर,राजाभाऊ राऊत,राजेंद्र शिंदे,पंकज सुर्यवंशी,वैभव सुर्यवंशी,विशाल गाडेकर,महावीर यादव,आकाश क्षिरसागर,संदीप क्षीरसागर,आदी उपस्थित होते.