प्रतिनिधी / विकी ओहोळ
दौंड – आम आदमी पार्टी दौंड शहर व तालुका यांच्या वतीने सुरू केलेल्या सदस्य नोंदणी अभियानास आज पर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला अनेक नागरिकांनी समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तर अनेकांनी पक्षाचे पुढील वाटचाली चे धोरण व शहरासाठी काय योगदान असेल याचा अंदाज घेतला व विचारपूस केली. देशात परिवर्तन होणे व महागाई कमी होण्यासाठी आप हा नवा पर्याय आहे अशा सुध्दा अनेकांनी भावना व्यक्त केल्या आज पर्यंत दौंड शहरात एकूण सदस्य नोंदणी ही जवळपास 110 च्या आसपास झाली आहे.देशाच्या विकासासाठी व प्रगतीसाठी सदस्य होऊन हातभार लावावा अशी विनंती आम आदमी पार्टीचे दौंड शहर व तालुका समन्वयक रवींद्र जाधव यांनी केली.