करमाळा प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या संसद रत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या बाबतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी अपशब्द व्यक्त केले आहे त्याचा निषेध म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून करण्यात आले.
या आंदोलना आगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील शहर अध्यक्ष शिवराज जगताप, महिला तालुका अध्यक्ष नालिनीताई जाधव, युवती प्रदेश सरचिटणीस पूजा ताई झोळ, युवती तालुकाध्यक्ष शितल क्षीरसागर, तालुका उप अध्यक्ष स्नेहल अवचर, जिल्हा उप अध्यक्ष नंदिनी लुंगारे, महिला जिल्हा सरचिटणीस विजयमाला गोवर्धन चवरे, जिल्हा उप अध्यक्ष गोवर्धन चवरे सर, तालुका उप अध्यक्ष राजश्री कांबळे, शहर उप अध्यक्ष आझाद शेख, वक्ता सेल तालुका अध्यक्ष अक्षय शिंदे, सह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते त्या वेळी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.