मदनवाडी येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 103 रक्तदात्यांनी रक्तदान केले
(निलेश गायकवाड )
मदनवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शिबिरात 103 दात्यांनी रक्तदान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सतीश शिंगाडे यांनी आपल्या लोकप्रिय नेत्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे,अनिकेत भरणे तसेच राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर,प्रदेश सरचिटणीस महेश देवकाते, तुकाराम बंडगर आबासो देवकते राजेंद्र देवकते, अजिंक्य माडगे प्रशांत शेलार प्रदीप वाकसे, महेश शेंडगे, अमोल देवकाते, संदीप वाकसे, विष्णुपंत देवकते, धनाजी थोरात, सतीश वाघ, नितीन काळंगे, शरद चितारे, शामराव आढाव, सचिन बोगावत, सचिन खडके, आबासो बंडगर, कुंडलिक बंडगर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात 103 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबीरास खुपच मोठा प्रतिसाद मिळाला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश गायकवाड, धैर्यशील बंडगर,दिनेश शिंदे, सुरत सोट,संजय शिंदे, नवनाथ सुतार, राहुल बंडगर, विकास बंडगर,अण्णा ठोंबरे , अनिल शिंदे, उमेश गायकवाड,संपत कारंडे,संग्राम गुरगुळे आदिंनी परिश्रम घेतले.
शिंगाडे यांनी प्रत्येक वर्षी रक्तदान शिबीराच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी घेऊन वाटचाल सुरु ठेवली आहे. तसेच त्यांनी येणाऱ्या काळात देखील विविध सामाजिक उपक्रम घेणार असल्याचे सांगितले.
