June 30, 2025 11:04 am

पेट्रोल – डिझेल पुन्हा झाले स्वस्त..

अपनी भाषा में पढ़े! Translate

केंद्र सरकार नंतर आता राज्य सरकार ने देखील केली करात कपात..

राज्यातील वाहनधारकांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे.. मोदी सरकारने शनिवारी (ता. 21) पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात केली होती. त्यानंतर ठाकरे सरकारवर कर कपात करण्यासाठी दबाव वाढला होता. अखेर ठाकरे सरकारनेही इंधन दराबाबत आज (ता. 22) मोठा निर्णय घेतला..केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोलच्या दरात 8 रुपये, तर डिझेलच्या दरात 6 रुपयांनी कपात केली होती. तसेच राज्यांनीही पेट्रोल व डिझेलवरील ‘व्हॅट’ कमी करावे, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते.देशातील इतर राज्ये पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करीत असताना, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवरही दडपण वाढले होते… विटोधकांकडून सातत्याने कर कमी करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर राज्य सरकारनेही आज पेट्रोल-डिझेलच्या ‘व्हॅट’मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला.. ठाकरे सरकारने पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे, तर डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात केली आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाला अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने करात कपात केल्याने दोनच दिवसांत पेट्रोल 11 रुपये 58 पैशांनी, तर डिझेल 8 रुपये 44 पैशांनी स्वस्त झाले आहे.’व्हॅट’ कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर दराने उपलब्ध होईल, तर डिझेल 95 रुपये 84 पैसे प्रति लिटर या दराने मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, महागाई कमी होण्यास मदत होणार आहे…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!