June 30, 2025 5:00 pm

ओबीसी आरक्षणप्रश्नी पुढच्या महिन्यात बांठिया समितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार

अपनी भाषा में पढ़े! Translate

ओबीसी आरक्षणप्रश्नी पुढच्या महिन्यात बांठिया समितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार
निलेश गायकवाड
मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यात ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी सरकारचा प्रयत्न सुरुच राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पिरिअल डेटा गोळा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या बांठिया समितीचा अहवाल पुढच्या महिन्यात आल्यावर सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

मध्यप्रदेशप्रमाणे सरकार न्यायव्यवस्थेसमोर आपली बाजू प्रभावीपणे मांडेल. त्यासाठी तज्ञ वकिलांचं पथक नियुक्त करण्यात आल्याचं ते म्हणाले. प्रभाग रचनेबाबत नाना पटोले यांच्या आरोपांबाबत मत व्यक्त करायला त्यांनी नकार दिला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!