July 1, 2025 10:34 am

देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारी नीरा नरसिंहपूर दौरा – स्वागत सभेचे आयोजन ; भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह..

अपनी भाषा में पढ़े! Translate

देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारी नीरा नरसिंहपूर दौरा – स्वागत सभेचे आयोजन ; भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह..

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या शुक्रवारी (दि.20) मे रोजी श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर ) दौऱ्यावरती येत आहेत. यावेळी नीरा नरसिंहपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर दुपारी 4 वा. भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे उपस्थितीत भव्य स्वागत सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी दिली.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांचे नीरा नरसिंहपूर येथे हेलिपॅडवर आगमन झालेनंतर ते कुलदैवत श्री लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन घेतील. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कारासाठी भव्य स्वागत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्वागत सभेसाठी नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार व शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी केले आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!