June 30, 2025 6:37 am

राहूलनगर सोसायटीच्या चेअरमनपदी भारत साळुंखे तर व्हा.चेअरमनपदी भास्कर गायकवाड

अपनी भाषा में पढ़े! Translate

राहूलनगर सोसायटीच्या चेअरमनपदी भारत साळुंखे तर व्हा.चेअरमनपदी भास्कर गायकवाड

प्रतिनिधी:- अजिनाथ कनिचे
माढा तालुक्यातील राहूलनगर (सुलतानपूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी भारत साळुंखे यांची तर व्हाईस चेअरमनपदी भास्कर गायकवाड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नुतन संचालकांची बैठक,तसेच अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाची निवड निवडणूक निर्णय अधिकारी श्री.एस.पी.मुंडासे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. तसेच नूतन संचालक औदुंबर साळुंखे, दत्तात्रय शिंदे, विनोद साळुंखे, पांडुरंग शिंदे, सुनील शिंदे, शरद धुमाळ, अनिता शिंदे, सुमन शिंदे, प्रकाश गायकवाड, सुरेश अधटराव, हरी भुई यांची निवड बिनविरोध झाली.
यावेळी राहुलनगरचे सरपंच रोहन धुमाळ, उपसरपंच सौ. कल्पना शिंदे, सचिव चंद्रकांत जाडकर, रावसाहेब शिंदे, दत्तात्रय शिंदे, प्रवीण शिंदे, अभिजीत साळुंखे, राजेंद्र साळुंखे, जीवन साळुंखे, रामहारी साळुंखे, अमोल साळुंखे, सुधाकर गायकवाड, युवराज साळुंखे, हनुमंत धुमाळ, शिवराज शिंदे, अनिल धुमाळ, (मेजर) अनिल शिंदे , राजेंद्र भुई, अजित साळुंखे यांच्यासह ग्रामस्थ व सभासद उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!