भाजपच्या लोकांनी आधी प्रथम शेती करावी त्यानंतर ऊसाची शेती करावी.
ज्या उसाची नोंद केली आहे त्या ऊसाचं टिपरू देखील शिल्लक ठेवलेले नाही
-नितीन धांडे
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत.ज्यांना उसाचे गुराळ कधी सुरू करता आले नाही, तुम्हाला ऊस कोणी लावण्यास सांगितला असे शेतकऱ्यांना म्हणणाऱ्या माजी मंत्री व त्यांच्या बगल बच्यानी अंबालिका कारखाना ,बारामती अग्रो आणि जय श्रीराम साखर कारखान्यावर टीका करणे म्हणजे प्रत्यक्षात सूर्याला प्रकाश देत नाही असे म्हणण्यासारखे आहे अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांनी पत्रक प्रसिद्धीस देवून केली आहे.
तब्बल १५ लाख टन गाळप
या यावर्षी अंबालिका साखर कारखाना, बारामती ॲग्रो व जय श्रीराम साखर कारखाना यांनी नोंद कर्जत व जामखेड तालुक्यातील पंधरा लाख मेट्रिक टन एवढ्या मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप केले आहे. तसेच आंबालिका व बारामती ॲग्रो यांनी शेतकऱ्यांना विक्रमी असा भाव दिला आहे. मतदारसंघांमध्ये ऊस उत्पादकांना चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे या एका गळीत हंगामामध्ये मिळणार आहेत. यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना या सर्व कारखान्यांचा किती फायदा झाला आहे याची जाणीव आहे.
एक लाख रुपये बक्षीस
श्री धांडे यांनी पुढे म्हटले आहे की अंबालिका सहकारी साखर कारखान्याने ज्या उसाची नोंद केली आहे आणि त्याचा कालावधी पूर्ण झाला आहे असा उसाचं टिपरू देखील शिल्लक ठेवलेले नाही. असे असताना देखील अंबालिका कारखान्याचा २१ हजार मे टन ऊस शिल्लक आहे असा आरोप केला आहे मात्र अशाप्रकारे नोंद असलेला व कालावधी पूर्ण झालेला एक एकर ऊस आरोप करणाऱ्यांनी किंवा त्यांच्या मंत्र्यांनी दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा अशी योजना मी जाहीर करतो आहे. तसेच आम्ही उसाची एक ही टिपरू शिल्लक राहणार नाही असे जाहीर केले होते तो शब्ददेखील पाळला आहे.
बारामती ॲग्रो व अंबालिका साखर कारखान्यामुळे कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने या वर्षी अतिरिक्त ऊस असताना देखील दिलासा मिळाला आहे. संपूर्ण राज्यात यावर्षी अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना देखील मतदारसंघांमधील शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची अडचण होऊ नये म्हणून आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन सर्व ऊस गाळप केला आहे . अनेक शेतकऱ्यांचा उसाची नोंद केलेली नव्हती मात्र पाण्याअभावी तो उस जळू लागला होता तो देखील या कारखान्यांनी घेऊन गेले आहेत.जो कमी कालावधीमध्ये ऊस शिल्लक आहे तो देखील पुढील गळीत हंगामामध्ये हमखास गाळप केला जाणार आहे.
माजी मंत्र्यांना विसर ,याद करो वो दीन…
लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये देखील कर्जत जामखेड तालुक्यात अतिरिक्त ऊस होता त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी करमाळा तालुक्यातील राजुरी परिसरामध्ये उसाचे गुऱ्हाळ सुरू होते तिथे उस दिला. मात्र त्याचे पैसे त्यांना मिळत नव्हते म्हणून त्यांनी मंत्र्यांना घरी जाऊन याबाबत पुढाकार घ्या आणि आमचे पैसे मिळवून द्या असे सांगितले असता त्यांनी शेतकऱ्यांना तुम्हाला ऊस कोनी लावण्यास सांगितला असे म्हणाले होते . त्यानंतर त्या शेतकऱ्यांना आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या उसाचे पैसे मिळवून देण्यास मदत केली.
आमदार रोहित पवार हे कधीही खोटी माहिती सांगत नाहीत किंवा जे खरे आहे आणि जे सत्य आहे आणि जे होणार आहे तेच ते सांगत असतात . मात्र शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपये मिळाल्याचे पाहून भाजपच्या काही मंडळींना पोटशूळ उठला आहे. त्यांचा जन्म कारखाना परिसरात झाला दुर्दैवानं त्यांना ऊसा बद्दल आणि कारखान्या बद्दल काहीच अक्कल नाही हे पाहून त्यांच्या बुद्धीची कीव येते. त्यांचाही दोष नाही स्टेथोस्कोप चा वापर करून उसाची रिकव्हरी कळणार कशी त्याला उसाच्या रानात जाऊन तपासणी करावी लागते. असा टोला नितीन धांडे यांनी लागवला असून भाजपच्या लोकांनी आधी प्रथम शेती करावी त्यानंतर ऊसाची शेती करावी आणि नंतर कारखानदारीवर बोलावे तोपर्यंत आपल्या पात्रतेनुसार आरोप करावे. जनतेची लोकसेवा करणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्यावर ठीका करण्याची आपली लायकी आहे का ते देखील या बगलबच्चे नी प्रथम नीट तपासून पाहावे असेही श्री धांडे यांनी म्हटले आहे.