नियमांचे भंग करनाऱ्या दोन टिप्पर वर ८५ हजाराची दंडात्मक कारवाई..
प्रतिनिधी :सुरेश बागडे
परंडा: दि.१४ मोटार वाहण नियमांचे भंग करनाऱ्या दोन टिप्पर वर धाराशिव मोटार वाहण निरिक्षक एम जी शेख व श्रीमती पी.एम उपासे यांच्या पथकाने दि १४ मे रोजी टिप्पर मालका कडून ८५ हजार रूपयाचा दंड वसुल केला आहे .परंडा कुर्डवाडी रोडवरील वागेगव्हाण शिवारात टिप्पर क्रमांक एम एच ४५ -१२५६ व टिप्पर क्रमांक एम एच ४५- १२५७ हे दोन टिप्पर मुरुमाची वाहतूक करीत होते .मोटार वाहण निरिक्षक शेख व उपासे यांच्या पथकाने वाहन तपासणी केली असता एका टिप्पर चे इंन्शुसन्स ची व परमेट ची मुदत संपली असल्याचे तपासणी मध्ये दिसुन आल्याने दोन्ही टिप्पर चे वजन करून परंडा बस आगारात लावण्यात आले .एका टिप्पर मध्ये ओव्हर लोड असल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली .परंडा तालूक्यात विना परवाना मुरूम वाहतूक होत असुन महसुल विभागाचे दुर्लक्ष होत आहे .सदरील मुरूम परंडा तालूक्यातील वागेगव्हाण येथील रस्ता कामासाठी टाकण्यात येत असल्याची माहिती टिप्पर चालक यांनी दिली आहे .