श्री उदय अरुण भोईटे यांची भारतीय जनता पार्टी युवक मोर्चा उपाध्यक्षपदी निवड
प्रतिनिधी भगवान लोंढे
श्री उदय अरुण भोईटे यांची भारतीय जनता पार्टी युवक मोर्चा इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय हर्षवर्धन जी पाटील साहेब यांच्या हस्ते श्री भोईटे यांची प्रशस्तीपत्र देऊन निवड करण्यात आली स्वर्गीय रमेश बाप्पू जाधव यांच्या आशीर्वादामुळेच हे पद मला मिळाले असून मी या पदाचा वापर गोरगरीब जनतेसाठी तसेच भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्या या निवडीमुळे कुंभारगाव व भिगवन पंचक्रोशी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व गरजू कार्यकर्त्याला न्याय मिळाला आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे.