July 1, 2025 12:49 pm

श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान निरा नरसिंहपुर येथील श्री नरसिंह जयंती नवरात्र उत्सवास सात तारखे पासून सुरुवात

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान निरा नरसिंहपुर येथील श्री नरसिंह जयंती नवरात्र उत्सवास सात तारखे पासून सुरुवात.

दिनांक: ५ प्रतिनिधी: समाधान रजपूत.

नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथील श्री नरसिंह जयंती नवरात्र उत्सव शनिवार दिनांक ७ मे पासून सुरू होत आहे यानिमित्त श्री नरसिंह जयंती नवरात्रोत्सव समिती निरा नरसिंहपुर याचे अध्यक्ष प्रशांत बादले पाटील तसेच उपाध्यक्ष उमेश घोडके खजिनदार विठ्ठल काका देशमुख यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.
दिनांक ७ शनिवार रोजी सकाळी भजन हे समस्त ग्रामस्थ शेवरे, टननु, पिंपरी, संगम, गिरवी व नरसिंगपूर या गावातील ग्रामस्थांचे होईल दुपारी ह. भ. प. श्री. हरि प्रसाद देहूकर यांचे प्रवचन होईल व रात्री ह. भ. प .श्री .आनंद काकडे महाराज यांचे कीर्तन होईल.दिनांक८ रविवार रोजी सकाळी भजनी मंडळ उस्मानाबाद यांचे भजन होईल. दुपारी सौ. संगीता रमाकांत चाटी यांचे भक्ती संगीत होईल आणि दुपारी ह. भ. प. देविदास महाराज जोशी पुणे यांचे प्रवचन होईल तसेच रात्री ह-भ-प श्री. राम श्रीधर रामदासी उस्मानाबाद यांचे कीर्तन होईल. दिनांक 9 रोजी सोमवार सकाळी आसावरी महिला भजनी मंडळ पंढरपूर यांचे भजन तसेच गिरीश कुलकर्णी सोलापूर यांचे भक्ती संगीत दुपारी प्रवचन ह. भ. प .सुनिल महाराज अकलूज आणि रात्री किर्तन ह. भ. प .संदिप मांडके यांचे होईल. दिनांक १० रोजी सकाळी सुगम संगीत श्री. अमित कुलकर्णी बार्शी तसेच बासरीवादन नंदकुमार डिंगरे, शिवचरित्र जाणता राजा कुमार साईराज मोहन घाटपांडे LLB जुन्नर यांचे होईल आणि प्रवचन ह. भ. प .संध्या संतोष पाठक सांगली यांचे होईल तसेच रात्री चे किर्तन ह. भ. प .भक्त राघवेंद्र देशपांडे यांचे होईल. दिनांक११ बुधवार सकाळचे भजन राम कृष्ण महिला भजनी मंडळ फलटण यांचे होईल सुगम संगीत श्री. रामचंद्र नवले व संतोष कवडे करकंब यांचे होईल प्रवचन ह. भ. प. एकनाथ महाराज पाटील मेढेकर सर यांचे होईल वसंत पूजा समस्त ब्रह्मवृंद नीरा नरसिंहपूर यांचे होईल आणि रात्री चे किर्तन ह. भ. प. शुभांगी पाठक मांडवे यांचे होईल. दिनांक 12 गुरुवार सकाळचे भजन श्री भक्त प्रल्हाद संगीत विद्यालय निरा नरसिंहपुर तसेच शारदा स्वरांजली भजनी मंडळ इंदापूर नागपुरे यांचे होईल दुपारचे प्रवचन ह-भ-प .श्री. पद्मनाभ व्यास उस्मानाबाद यांचे होईल आणि रात्रीचे कीर्तन हे ह. भ. प .सौ राजश्री राजेंद्र गंगाखेडकर नांदेड यांचे होईल. दिनांक 13 वार शुक्रवार सकाळी भक्ती संगीत सौ निता कुलकर्णी आणि सौरभी व निलेश आराध्य यांचे होईल सुगम संगीत दुपारी सौ सुकन्या अ. दंडवते यांचे होईल दुपारी प्रवचन हे ह .भ. प. तुकाराम नारायण विप्र योगीसुत यांचे होईल आणि रात्रीचे कीर्तन हे ह .भ. प .सुप्रिया सचिन पवार वालचंदनगर यांचे होईल. दिनांक 14 वार शनिवार श्री लक्ष्मी नरसिंह जयंती उत्सव दिवशी सकाळी भक्ती संगीत हे श्री समर्थ भक्त अजित गोसावी इंदापूर यांचे होईल तसेच सकाळी भक्ती संगीत सौ शुभांगी अरगडे रमेश रावतेकर व सहकारी यांचे होईल दुपारी प्रवचन ह. भ. प .मोहन बुवा रामदासी यांचे होईल आणि सायंकाळी नरसिंह जयंती किर्तन ह. भ. प .विलास गरवारे सर सिद्धेश्वर कुरवली यांचे होईल. दिनांक 15 वार रविवार रात्री छबिना श्रींची पालखी व मिरवणूक होईल तसेच दिनांक १६ वार सोमवार सकाळी ९ते दुपारी१२ काल्याचे किर्तन हे ह .भ. प. श्री .अंकुश रणखांबे महाराज नीरा नरसिंहपूर यांचे होईल आणि दुपारी चार वाजता जंगी कुस्त्या चा कार्यक्रम घेतला जाईल.
या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे, प्रसिद्ध उद्योगपती विजय सरवदे, आनंद काकडे ,माजी सरपंच नरहरी काळे, अण्णासाहेब काळे ,हनुमंत काळे, विलास ताटे, जगदीश सुतार, दशरथ राऊत ,सचिन कदम ,डॉक्टर सिद्धार्थ सरवदे, संतोष मोरे, अरुण क्षीरसागर, पप्पू गोसावी, तुकाराम भंडलकर ,प्रभाकर जगताप, नाथाजी मोहिते, किशोर मोहिते ,नितीन सरवदे ,नितीन भोसले ,उमेश कोळी, बापू जगदाळे, राजेंद्र निंबाळकर, अतुल हावळे, सिद्धेश्वर काळे, डॉक्टर अरुण वैद्य,राजेंद्र देशमुख, नाना देशमुख, राजू बळवंतराव, डॉ.सिध्दार्थ सरवदे, दत्ता कोळी, बाबुराव गव्हाणे, अक्षय गोडसे, अमोल गोडसे, शिवाजी गोडसे , अण्णासाहेब घोडके, गौतम सरवदे अशोक सरवदे, घनश्याम सरवदे तसेच सर्व ग्रामस्थ निरा नरसिंहपुर यांचे सहकार्य राहील.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!