यशस्विनी महिला प्रभाग संघाची स्थापना,प्रभाग संघाच्या अध्यक्षपदी पुष्पा थोरात यांची निवड
(निलेश गायकवाड )
भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद गटात
यशस्विनी महिला प्रभागसंघ संस्था याची भिगवणमध्ये स्थापना करण्यात आली. यावेळी भिगवण प्रभाग संघाच्या अध्यक्षपदी मदनवाडी येथील पुष्पा विकास थोरात यांची निवड करण्यात आली.
इंदापूर विकास गटाअंतर्गत भिगवण-शेटफळगढे गटामधील जिल्हा परिषद गटातील १२ ग्रामपंचायतमधील १२ ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष यांची मिळून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रणित " यशस्विनी महिला प्रभागसंघ संस्था भिगवणमध्ये नुकतीच स्थापन करण्यात आली.आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून महिला समूहातील ,ग्रामसंघातील व प्रभागातील महिलांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यावेळी उमेद अभियानाविषयी तालुका अभियान व्यस्थापक सचिन बाबर,तालुका व्यवस्थापिका राणी ननवरे यांनी सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी सणसर - लासुर्णे गटाचे प्रभाग समन्वयक डी.जे.राऊत,
भिगवण-शेटफळगढेचे प्रभाग समन्वयक चेतन रांजणकर,प्रभागसंघाच्या अध्यक्ष पुष्पा थोरात,सचिव राणी खरात ,कोषाध्यक्ष सुनीता नरुटे यांच्यासह सदस्य व समूह संसाधन व्यक्ती उपस्थित होत्या.
