July 1, 2025 1:17 pm

पंकज ठाकरे गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित..

अपनी भाषा में पढ़े! Translate

पंकज ठाकरे गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित..
अमरावती जिल्ह्यातील इसापूर या गावातून अत्यंत गरिबीच्या परिस्थितीशी संघर्ष करत नागपुरला कामासाठी आलेले व ग्राईंडवेल नॉर्टन या खाजगी आस्थापनेत काम करत असताना आपल्या कर्तृत्वाने कर्मयोगी फाऊंडेशन ही संस्था स्थापन करून
बोलते नव्हे तर कर्ते व्हा हा संदेश देत कार्य करणारे कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व ग्राईंडवेल नॉर्टन लिमिटेड बुटीबोरीचे कामगार पंकज ठाकरे यांना कामगार मंत्री व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व राज्य मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे दि. १९ एप्रिल २०२२ ला मुंबई येथे २०१९ चा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. २५००० रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पंकज ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन भष्ट्राचारा विरुद्ध लढत लढत कर्मयोगी फाऊंडेशनची स्थापना केली व त्या मार्फत श्रमदानातुन आदर्श ग्राम निर्मितीवर मोठ्या प्रमाणात काम केले. हे करतानाच त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले, जलसंधारणाची कामे केली, वाचनालयासाठी आर्थिक मदत केली, ग्रामस्वच्छता सप्ताह राबविले, रस्त्याला पडलेले जीवघेणे खड्डे श्रमदानातून बुजविले, लाखो रुपयांची स्पर्धा परीक्षा पुस्तके मुलांना उपलब्ध करून दिली, गावोगावी आरोग्य शिबीर राबविले, शंभर पेक्षा जास्त लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून आणल्या, नवरात्रात ५०० विधवा महिलांना प्रत्येकी एक हजार रुपयांची साडीचोळी घेऊन जित्याजागत्या देवींच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले . बुटीबोरी येथे कामगार कल्याण मंडळ नव्हते त्या कामगार मंडळाची स्थापना २०१८ मध्ये घडवून आणली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ७१ दिवस निरंतर अन्नदान तेही बासुंदी पासून ते पुरणपोळीपर्यंत केले , अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत, अनेक मुलींच्या शिक्षणाला आर्थिक मदत, रुग्णांना आर्थिक मदत, स्वच्छतेच्या दूत, धुणीभांडी करणाऱ्या महिलांना साडीचोळी देऊन त्यांची संक्रांत साजरी केली. विधवा महिलांना दिवाळीचा संपूर्ण किराणा तसेच त्यांच्या संपूर्ण परिवाराला नवीन कपडे, ५१ विधवा महिलांना शिलाई मशीन वाटप, ५० गावात आधार काठी वाटप, फुटपाथवर काम करणाऱ्या लोकांना सावलीसाठी १०१ छत्रीचें वाटप तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बुटीबोरी परिसरातील सर्व दवाखान्यात चहा बिस्कीट, नास्ता व जेवणाची निशुल्क सोय, रुग्णांसाठी चारचाकी गाडी उपलब्ध करून दिली, तब्बल ५१३ लोकांना ५२ क्विंटल ३० किलो अन्नधान्याचे वाटप, दोन मोक्षधामची साफसफाई, मोठ्या प्रमाणात मास्क वाटप, कोरोना रुग्णाची राख उचलून तिची योग्य विल्हेवाट लावली, सातगाव मोक्षधामचा संपूर्ण कायापालट, पत्रकार, पोलीस, आरोग्य अधिकारी, विद्यार्थी, संयुक्त कुटुंब पद्धती, आई वडीलांची सेवा करणारी मुले, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणात सत्कार घडवून आणले.
कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांच्या मुलींचा शिक्षणातील उत्साह वाढविण्यासाठी१०१ सायकल वाटप व निरंतर गोरगरीब लोकांसाठी कर्मयोगी फाऊंडेशन विविध उपक्रम राबवित या भागात देवदूताप्रमाणे काम करत आहे. त्यामुळे कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांना गुणवंत पुरस्कार देऊन
योग्य व्यक्तीची निवड केली असे अनेक मान्यवरांनी बोलून दाखवत पंकज ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
या पुरस्कारा विषयी पंकज ठाकरे याना विचारले असता ते म्हणाले की आम्ही देण्याची संस्कृती जपत आहोत.
आणि या विश्वात घेणारं व्यक्तिमत्त्व कधीच मोठं झालं नाही तर देणारं व्यक्तिमत्वच मोठं झालं आहे. त्यामुळे
मला जो “गुणवंत कामगार पुरस्कार” मिळाला आहे तो मी विनम्रतापूर्वक माझ्या सर्व कामगार बांधवांना समर्पित करत आहे. तसेच मला पुरस्कार स्वरूप मिळालेली २५००० रुपये रक्कम माझी आई श्रीमती आशाताई गोवर्धनराव ठाकरे यांच्या नावे दुखीकष्टी लोकांच्या सेवेसाठी कर्मयोगी फाऊंडेशन मध्ये जमा करून माणसातली माणुसकी जपण्याच थोडं फार कार्य करत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!