इंदापूर तालुक्यातील राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना भ्रष्टाचाराच्या विळख्यात
नीरा नरसिंह पूर
प्रतिनिधी: समाधान रजपूत.
इंदापूर तालुक्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर ती चालू असलेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना या योजनेअंतर्गत वृक्ष लागवडी साठीचे उद्दिष्ट प्राप्त असलेल्या ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड केलेली आहे परंतु काही ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रांमधील वृक्षलागवड हे ग्रामरोजगार सेवकांच्या मनमानी कारभारा नुसार चालत आहे मस्टर काढणे मजूर बदलणे असे सर्व व्यवहार ग्रामपंचायतीच्या परस्पर होत असून याच्यामध्ये इंदापूर तालुक्यातील प्रशासन रोजगार हमी योजनेचा कक्ष व रोजगार सेवक या सर्वांचे लागेबांधे असून गावातील लोकांनी रोजगार मागणीसाठी दिलेले अर्ज सुद्धा विचारात घेतली जात नसून , कायम स्वतःच्या कुटुंबातीलमजुरांना काम दिले जात आहे. यामुळे सदर योजना ही ग्रामरोजगार सेवक हे चालवत असून तेच रोजगार योजनेचे मालक झालेले आहेत. अशी बाब जनतेसमोर आली असून याबाबत जनतेमध्ये तीव्र भावना झालेले आहेत यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजने मध्ये झालेला आहे. हे सिद्ध होऊ शकते यासाठी वरिष्ठ पातळीवरच्या प्रशासनाने दखल घेऊन सदर योजनेचा कारभार कसा चालू आहे. व सदर योजना ही फक्त कोणा एकाची मालमत्ता आहे. की काय याची शहानिशा करणे गरजेचे आहे. या योजनेबद्दल इंदापूर तालुक्यातील जनता व जॉब कार्ड धारक पुढील काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची शक्यता आहे.