जिल्हा परिषद शाळा तांदुळवाडी येथे शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न
म्हैसगाव _अजिनाथ कनिचे
माढा तालुक्यातील तांदुळवाडी जिल्हा परिषद आदर्श शाळा तांदुळवाडी येथे शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने तयार करण्यात आलेल्या अभ्यासाची पुस्तके पंचायत समितीचे सदस्य अभिजित कसबे यांच्या हस्ते अंगणवाडीच्या लहान मुलांना वाटण्यात आली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की,
गेले कित्येक महिने आपण कोरोनामुळे प्रभावित झालेलो आहोत. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही झालेला आहे. काही मुले येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होतील, पण प्रत्यक्षात त्यांना अंगणवाडी किंवा बालवाडीचा अनुभवच घेता आलेला नाही. या मुलांची व्यवस्थितपणे शाळापूर्व तयारी होणे फार आवश्यक आहे, ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना वाचन-लेखन शिकताना कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि ते व्यवस्थितपणे शिकू शकतील. असे ते म्हणाले.
यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष विष्णू अनपट, उपाध्यक्ष राधा माने, मुख्याध्यापक वासकर सर व शिक्षक स्टॉप , राहुल भोई, महादेव भोसले, अतुल गवळी, पंकज गवळी, अंगणवाडी चे जयश्री गुरव, मिनाबाई माने, अंगणवाडीचे बालक व त्यांचे पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन आणि पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी तयारी केली होती. नाना माने यांनी उपस्थित पालक व मान्यवरांचे आभार मानले.