कडक सॅल्यूट!
चिमुकल्याला स्टेशनवरच आला तापाचा झटका; मदतीला आला वर्दीतला देव_
सोलापूर/सागर गायकवाड
सोलापूर: आयुष्यात कधी काय संकट येईल हे काही सांगता येक नाही, हे खरं असलं तरी त्या संकटात कोण कधी कामी येईल हेही सांगता येणार नाही. असाच एक प्रत्यय आलाय धसाडे कुंटुंबियांना. या कुटुंबातील चिमुकला ‘ओवी’ याच्यावर संकट आलं, पण त्या संकटातू त्याला बाहेर काढण्यासाठी कर्तव्यावर असलेले आरपीएफ जवान खाकी वर्दीच्या रुपात देवासारखे धावून आले आणि या चिमुकल्याला जीवनदान दिले.