रोटरी क्लब भिगवन व दत्तकला शिक्षण संस्था यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिर…
(निलेश गायकवाड)
महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रोटरी क्लब ऑफ भिगवन व दत्तकला शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने दत्तकला फार्मसी कॉलेज येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच आज दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री रामदास झोळ सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी रोटरी क्लब चे अध्यक्ष श्री संजय खाडे, संपत बंडगर, संजय चौधरी, किरणं रायसोनी, रियाज शेख, औदुंबर हुलगे, महेश शेंडगे, सौ. रेखा खाडे, सौ. वैशाली बोगावत, सौ. मीना बंडगर, सौ. सूषमा वाघ, नियोजित अध्यक्ष डॉ.अमोल खानावरे तसेच दत्तकला फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डाॅ.सुनिल हरेर उपस्थीत होते.
यावेळी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय खाडे म्हणाले की सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरे मोठ्या प्रमाणावर झाली तरच रक्ताचा तुटवडा भासणार नाही. डॉ.अमोल खानावरे यांनी रक्तदानाचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन श्री सचिन बोगावत, प्रदिप वाकसे, प्रविण वाघ यांनी केले. यावेळी 118 जणांनी रक्तदान केले.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. श्रीकांत कवितके
व आभार प्रा. सुप्रिया वाबळे
यांनी मानले….