रात्री गाड झोपलेल्या अवस्थेत पत्रकारासह अमित गँस एजन्सी कर्मचाऱ्यांचा पंचवीस हजाराचे मोबाईल चोरीला…
दोंडाईचा- मागे तीन दिवसापुर्वी दोंडाईचा पोलिसांनी रात्री सिंघम स्टाईल चोरी-घरफोडी गँगशी दोन हात करत,एकाला दरोडा-घरफोडीच्या उद्देश व हत्यारासह अटक केली आहे. म्हणून दोंडाईचाकरांनी चोरी-घरफोडीच्या घटनेबाबत सुटकेचा श्वास टाकत.आता गावात अच्छे दिन-सुरक्षिततेची भावना निर्माण होऊन चोऱ्या-घरफोड्या बंद होतील, अशी आशा बाळगत होते.मात्र गावात पुन्हा दोन कुटूंबाकडे रात्री गाड झोपलेल्या अवस्थेत चार मोबाईल चोरीच्या घटनेने नागरिकात पुन्हा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असुन,आता आपले दिवस बदलणार नाहीत. आपण दिवसभर कामातुन कितीही थकुन आलो तरी.रात्री आपल्या जान व मालची सुरक्षा स्वतः च करायची,अशी भावना निर्माण झाली आहे. म्हणून दोंडाईचा पोलीसांनी फक्त एक-दोन चोर पकडून जनतेला दिलासा देता येणार नाही. त्यासाठी पुर्ण गाव पिंजून असे सर्वसामान्य-सज्जन माणसांच्या घर-दुकानात चोरी करणारे सडके आंबे-चोर शोधून कायमस्वरूपी त्यांना गजाआड करायला हवे,अशी आशा आता नागरिक पोलीस विभागाकडे करत आहे.तसेच परवा गावात चोरी गेलेल्या मोबाईल बाबत दिलेली फिर्याद अशी की,मी सुनिल सुकलाल धनगर वय-४४- व्यवसाय पत्रकारीता राहणार वर्धमान नगर चुडाणे रोड दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे. मो .न. ९४२०४४२६०९ समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद लिहून देतो की, मी वरील ठिकाणी पत्नी नामे भारती सुनिल धनगर व माझी मुलगी नामे किरण असे एकत्र राहत असुन मी पत्रकारीता व्यवसाय करून माझा व परीवाराचा उदरनिर्वाह चालवितो. काल दिनांक ०९/०४/२०२२ रोजी मी कामानिमित्त धुळयात गेलो होतो. रात्री ११.०० वाजता धुळ्याहून आल्या नंतर मी जेवण करून रात्री १२.०९ वाजेच्या सुमारास मी व माझे परीवार हे माझ्या राहत्या घराचा दुसऱ्या मजल्यावरील धाब्यावर झोपण्यास गेलो व माझा मोबाइल हा माझ्या उशिजवळ ठेवला होता. आज दिनांक १०/०४/२०२२ पहाटे मी ०५.०० उठलो. तेव्हा मी माझा मोबाइल शोधला असता माझा मोबाइल हा मिळुन आला नाही. त्यानंतर माझी पत्नी भारती हिचा देखील मोबाइल शोधला असता तिचा मोबाइल हा धाब्यावर मिळुन आला नाही. त्यावेळेस माझी खात्री झाली की, रात्री कोणीतरी अज्ञात चोरटयाने माझा व माझ्या पत्नीचा मोबाइल हा राहत्या घराचा धाब्यावरून चोरून नेला आहे. माझ्या व माझ्या पत्नीचा मोबाइलचे वर्णन खालील प्रमाणे 1) व्हिवो वाय-२०- जी कंपनीचा मोबाइल IMEI No 86611505583803 त्यात जिओ कंपनीचा सिम कार्ड नं 9420442609) सँमसंग कंपनीचा जे IMEL NO. 354636/09/496662/2 त्यात जिओ कंपनीचे सिम कार्ड न 7588611877 एकुण किंमत १५०००/₹ येणे प्रमाणे वरील किंमतीचा व वरील वर्णनाचा मोबाइल हा दिनांक १०/०४/२०२२ रोजी रात्री १२.०० वाजेपासुन ते सकाळी ०५.०० वाजे पूर्वी दोंडाईचा शहराचा वर्धमान नगर चुडाणे रोड येथील माझ्या राहत्या घराचा धाब्यावरून अज्ञात इसमाने लबाडीच्या इराद्याने माझ्या संमतीशिवाय चोरून नेला आहे. म्हणुन माझी अज्ञात चोरटया विरुद्ध फिर्याद जाहे. माझी वरीत फिर्याद मी वाचून पाहिली असता ती माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर आहे.तसेच दुसरी फिर्याद अशी की,विजय वाल्मिक गिते वय-३८ व्यवसाय खाजगी नोकरी राहणार प्लॉट नं. ४१ विमल नगर चुडाणे रोड दोंडाईचा ता. शिंदखेड़ा जि. धुळे. मो.नं. ९४०४५६६६९३ समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहन फिर्याद लिहून देती की, मी वरील ठिकाणी पत्नी नामे चेतना विजय गिते व एक मुलगी दोन मुल असे एकत्र राहत असुन मी खाजगी नोकरी करून माझ्या परीवाराचा उदरनिर्वाह चालवितो. काल दिनांक ०९/०४/२०२२ रोजी सकाळी ०७.०० वाजता मी कामानिमित्त अमित गैस गोडावुन येथे गेलो होतो व सांयकाळी ०७.०० वाजता कामावरून घरी आलो. नंतर आम्ही सर्वजण जेवण करून रात्री ११.०० वाजेचा सुमारास मी व माझे परीवार हे माझ्या राहत्या घराचा धाब्यावर झोपण्यास गेलो व माझा मोबाइल हा माझा उशिजवळ ठेवला होता आज दिनांक १०/०४/२०२२ पहाटे मी ०५.०० उठलो. तेव्हा मी माझा मोबाइल शोधला असता माझा मोबाइल हा मिळून आला नाही. त्यानंतर माझी पत्नी चेतना हिचा देखील मोबाईल शोधला असता, तिचा मोबाइल हा धाब्यावर मिळुन आला नाही. त्यावेळेस माझी खात्री झाली की, रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझा व माझ्या पत्नीचा मोबाइल हा राहत्या घराचा धाब्यावरून चोरून नेला आहे. माझ्या माझ्या पत्नीचा मोबाइल खालीलप्रमाणे- 1) व्हिवो वाय-19 कंपनीचा मोबाइल IMEI No 868317048502214 त्यात जिओ कंपनीचा सिम कार्ड नं 8208242593 तसेच बी. एस. एन. एल. कंपनीचा मो. नं. 94045666932) रेडमी कंपनीचा 8 IMEI NO 863045046978772 त्यात जिओ कंपनीचे सिम कार्ड नं. 8767608966 एकुण किंमत १०,०००/ जु. वा. कि. अंदाजे येणे प्रमाणे वरील किंमतीचा व वरील वर्णनाचा मोबाइल हा दिनांक १०/९४/२०२२ रोजी रात्री १२.०० वाजेपासुन ते सकाळी ०५.०० वाजेचा पूर्वी दोंडाईचा शहराचे विमल नगर चुडाणे रोड येथील माझ्या राहत्या घरचा धाब्यावरून अज्ञात इसमाने लबाडीच्या ईरादयाने माझ्या संमतीशिवाय चोरून नेला आहे म्हणून माझी अज्ञात चोरट्या विरुद्ध तक्रार आहे,अशा दोघी फिर्याद दाखल केल्या आहेत.