भारतीय पत्रकार संघाच्या दौंड शहर उपाध्यक्षपदी संदिप बारटक्के यांची निवड.
दौंड प्रतिनिधी / विकी ओहोळ
दौंड : शहरातील टाईम्स 9 न्युज मराठीचे पत्रकार संदिप बारटक्के यांची आज भारतीय पत्रकार संघाच्या दौंड शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

गेली दोन वर्ष टाईम्स 9 न्युज मराठी च्या माध्यमातून आपल्या लेखणीतून विविध विषयांवर वाचा फोडून निर्भीडपणे आपले विचार व सामाजिक पश्नांवर मत मांडून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे प्रामाणिक पणे काम करून पत्रकारीतेला न्याय दिला .यांच्या कामाची दखल घेऊन भारतीय पत्रकार संघानी त्यांची भारतीय पत्रकार संघाच्या दौंड शहर उपाध्यक्षपदी निवड केली.
निवडीचे पत्र भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा प्रवक्ते दिनेश पवार यांनी दिले.
यावेळी संदिप बारटक्के यांनी निवड झाल्याबद्दल सर्व पत्रकार बंधुचे आभार मानले.