पुस्तकांच्या माध्यमातून तालुक्यात अनेक अधिकारी घडावेत :-महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस विजयसिंह चौधरी
प्रतिनिधी:- संतोष सोनटक्के
इंदापूर :- इंदापूर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अभ्यासिकेत अनेक विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन अहोरात्र मेहनत करत असतात त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस विजयसिंह चौधरी यांनी अभ्यासिकेत एमपीएससीच्या अभ्यासक्रमाची पुस्तके भेट दिली. पुस्तकांच्या साहाय्याने तालुक्यात अनेक अधिकारी घडावेत व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील युवकांनी मार्गक्रमण करावे अशी इच्छा यावेळी चौधरी यांनी व्यक्त केली. याप्रसंगी पोलिस उपनिरीक्षकपदी चेतन ढावरे यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इंदापूर तालुका बार असोशियन चे अध्यक्ष ॲड. मनोहर चौधरी , डॉक्टर शिंदे , सौ. जयश्रीताई गटकुळ , सौ. विमलताई चौधरी, महाराष्ट्र विद्यार्थी काँग्रेस सचिव अभिजित गोरे-देशमुख, इंदापूर तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्ष मिलिंद साबळे, इंदापूर काँग्रेसचे सुफियान जमादार ,उमेश ढावरे, गणेश काळदाते ,श्रेयश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
