उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले अभिजीत पाटील यांचे कौतुक!
१२ वर्ष बंद असलेला सांगोला साखर कारखाना केला सुरु
पंढरपूर प्रतिनिधी गणेश ननवरे
काल पुणे येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १२वर्ष बंद असलेला सांगोला सहकारी साखर कारखाना धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी चालू केला आणि अवघ्या ३५दिवसांत सुरू करून तो उत्तम पद्धतीने यशस्वी गाळप देखील सुरू आहे. ऊस तोडणीसाठी आधुनिक साधनांच्या निर्मिती बाबत सांगोला साखर कारखान्यावर तोडणी यंत्राचा वापर केला आहे. नवनवीन आधुनिक साधनांचा वापर करण्याचे प्रयत्न अभिजीत पाटील यांचे सुरू असतात असे अजित पवार म्हणाले. याबद्दल अजित पवार यांनी अभिजीत पाटील यांचे अभिनंदन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले अभिजीत पाटील यांचे कौतुक!
— manoj chitte (@manojchitte8) April 5, 2022
१२वर्ष बंद असलेला सांगोला साखर कारखाना केला सुरु@AjitPawarSpeaks pic.twitter.com/kyrz7eSgu4