June 30, 2025 11:21 pm

बालकांच्या शिक्षणात होवु नये बिघाड म्हणुन शिक्षकाने केला जुगाड

अपनी भाषा में पढ़े! Translate

बालकांच्या शिक्षणात होवु नये बिघाड म्हणुन शिक्षकाने केला जुगाड
आय टी आय शिक्षक एम व्ही पाटील यांचा स्तुत्य उपक्रम

पारोळा : अगोदर कोरोना महामारी मुळे व आता एस टी चा बेमुदत संप यामुळे ग्रामिण भागातुन शहरी भागात शिक्षणा साठी रोज ये जा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे . ज्या विद्यार्थी पालकांकडे खाजगी वहान आहे ते त्याचा उपयोग करून पाल्यांना शाळेत नियमित ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत . पण ज्या पालकांकडे खाजगी वाहन नाही त्यांचे पाल्य मात्र बस बंदमुळे शिक्षणापासुन वंचित आहेत . समाजातील काही शिक्षणप्रेमी मात्र अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी प्रयत्न करतांना दिसतात . त्याचे एक सुंदर व स्तुत्य उदाहरण दगडी सबगव्हाण ता पारोळा येथिल आय टी आय टेहु ता पारोळा येथे कार्यरत शिक्षक एम व्ही पाटील उर्फ मोतीलाल पाटील यांच्या रुपाने समोर आले आहे . ते दगडीसबगव्हाण ते टेहु रोज ये जा करतात . असे करतांना वाहना अभावी घरी राहणारे विद्यार्थी बघुन त्यांनी त्यांना मदत करण्याचे ठरवुन आपल्या कल्पनाशक्तीने १० क्विंटल वजन ओढु शकेल अशी चार टायरची छान ट्रॉली बनविली व ती आपल्या मोटर सायकलला जोडणी करण्याची सोय केली . जानेवारी महिन्यापासुन शाळा उघडल्या पासून ते रोज १० ते १२ विद्यार्थ्यांना बसवुन पारोळा येथे नियमित त्यांना शिकवणी व शाळेच्या कामासाठी सोडतात . संध्याकाळी परत जातांना त्यांना परत नेतात . पाटील सरांच्या या शैक्षणिक सेवेचे व स्तुत्य उपक्रमाचे परिसरात मोठे कौतुक होत आहे . दगडीसबगव्हाण हे पारोळा धरणगाव रस्त्यावर राजवड नजिक रस्त्यापासुन ५ किलो मिटर आतमध्ये आहे . विदयार्थ्यांना इतर वाहन मिळणेही अवघड आहे . त्यामुळे विद्यार्थी पाटील सरांच्या उपक्रमाचा योग्य लाभ घेत परिसरातील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात पाटील सरांचे अभिनंदन व कौतुक करून समाजातील इतर बांधवांनीही रस्त्यावर वाहनाची वाट बघत असलेल्या विद्यार्थ्यांना लिफ्ट देवुन सहकार्य करण्याची विनंती केली आहे .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!