2 महिन्यापासून फरार आरोपीना वावददे येथून पारोळा पोलिसांनी अटक केली व धुळे जेल रवाना-
प्रतिनिधी मयुर पाटील
दि 20/1/2022 रोजी फिर्यादी नामे अनिल गणपत पाटील रा सुमठाणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केले नाही हा मनात राग धरून सुमठाणे येथील 8 आरोपीने गैरकायद्याची मंडळी जमून फिर्यादिस चाकूने गंभीर जखमी करून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केलेने गुन्हा कलम 307,143,147,158,149,323,504,506,IPC प्रमाणे गुन्हा दाखल होता,गुन्हा घडले पासून आरोपी नाव 1) गोपाळ छबिलदास पाटील 23,
2) राहुल वसंत पाटील वय 23 रा सुमठाणे हे फरार होते,मिळालेले खात्रीशीर बातमीवरुन नमूद दोन्ही आरोपी वावडदे येथे उसाचे रसाचे दुकानावर काम करीत आहे अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी API बागुल व DB स्कॉडचा स्टाफ तात्काळ रवाना करून दोन्ही आरोपीना नमूद गुन्ह्यात अटक केली व मा CJM श्री महानकर साहेबांचे समक्ष न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींची 2 दिवस PCR मिळून धुळे जेल येथे रवाना करण्यात आले आहे.